
"Why do we celebrate Diwali and perform Laxmi Puja on this day?"
दिवाळी ह्या सणाबद्दल विस्तृत माहिती.
दसरा संपला आणि दीपावली जवळ आली, आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले; पण एका प्रश्नावर सगळे विद्यार्थी चूप बसले. त्यांना काहीही उत्तर सुचेना. शांतता पसरली!
“जर का दीपावली हा सण भगवान रामचंद्रांच्या १४ वर्षांच्या वनवासानंतर ते अयोध्येला परतण्याचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, तर मग दीपावलीच्या दिवशी ‘लक्ष्मी पूजन’ का केलं जातं?
कुणालाच या प्रश्नाचं उत्तर माहीत नव्हतं! विद्यार्थ्यांना मी असे उत्तर दिले ,
“दीपावली हा सण दोन युगांशी म्हणजेच ‘सत्ययुग’ (“Age of Truth”) आणि ‘त्रेता युग’ (Divine years associated with the epic tales of Lord Rama) यांच्याशी जोडलेला आहे. सत्ययुगात समुद्र मंथनातून माता लक्ष्मी याच दिवशी प्रकट झाली होती म्हणून ‘लक्ष्मी पूजन’ केलं जातं. भगवान श्रीरामसुद्धा त्रेता युगात याच दिवशी अयोध्येला परतले होते, त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं. म्हणूनच या सणाचं नाव दीपावली असं आहे. म्हणूनच या पर्वाची दोन नावे आहेत, ‘लक्ष्मी पूजन’ हे सत्ययुगाशी संबंधित आहे, आणि दुसरं ‘दीपावली’ हे त्रेतायुगातील प्रभु श्रीराम आणि दिव्यांची आरास याच्याशी संबंधित आहे!”
मग सर्व विद्यार्थ्यांनी एकदमच टाळ्यांचा कडकडाट केला!
दीपावली हा सर्वात मोठा सण आहे. दिवाळी म्हणजे आनंद, खाद्य, स्वच्छता, रांगोळी आणि दिव्यांचा सण. दिवाळी ह्या सणाबद्दलची ही माहिती आपल्या ज्ञानात नक्कीच भर करेल.